भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिवपदी पिराजी (मामा) मंजुळे यांची निवड

 
भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिवपदी पिराजी (मामा) मंजुळे यांची निवड

उस्मानाबाद -  भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी उस्मानाबाद येथील माजी नगरसेवक आणि ओबीसी समाजाचे नेते पिराजी (मामा)  बाबुराव मंजुळे यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या सचिवपदी नियुक्ती केली.   त्यावेळी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष व माजी आमदार योगेश टिळेकर, औसा आमदार अभिमन्यू पवार, उस्मानाबाद  बीजेपी अध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता कुलकर्णी, ऍड. खंडेराव चौरे, सुधीर आण्णा पाटील, अभय चालुक्य आदी उपस्थित होते.

योगेश टिळेकर यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात  ही जबाबदारी पार पाडत असताना आपण आपल्या संघटन कौशल्याने राज्यभरात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे संघटन वाढवावे, ओबीसीच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच ओबीसी समाज जास्तीत जास्त भाजपामध्ये सामील होण्यासाठी आपण परिश्रम कराल असा आत्मविश्वास व्यक्त करून संघटन कौशल्य अशी जबाबदारी देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पिराजी (मामा) मंजुळे हे सच्चे समाजसेवक आहेत त्यांनी आज पर्यंत आपल्या सामाजिक कार्यातून त्याच बरोबर नगरसेवक पदाच्या कार्यकाळात सर्वसामान्यांना ओबीसी घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.  या त्यांच्या कार्याची दखल भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार टिळेकर यांनी घेऊन त्यांना यापुढच्या काळात ओबीसी समाजाला न्याय देता यावा यासाठी महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी काम करण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.  पिराजी (मामा) मंजुळे यांच्या निवडीचे धाराशिव जिल्ह्यात व राज्यात सर्वत्र स्वागत होत आहे.
 

From around the web