कोविड केयर सेंटरसाठी उस्मानाबाद जिल्हयातील आणखी आठ इमारती ताब्यात घेणार

 
कोविड केयर सेंटरसाठी उस्मानाबाद जिल्हयातील आणखी आठ इमारती ताब्यात घेणार

उस्मानाबाद - जिल्हयात गेल्या काही दिवसांपासून कोविड रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पूर्व तयारीच्या अनुषंगाने कोविड केयर सेंटर उभारण्यासाठी जिल्हयातील आठही तालुक्यात प्रत्येकी एक या प्रमाणे आठ इमारतींचे अधिग्रहन करुन त्या ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन  समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे जारी केले आहेत.

     या अधिग्रहित करण्यात आलेल्या इमारतींचे नाव(तालुका) आणि बेडची संख्या अशी-

उस्मानाबाद येथील नवीन मुलांचे वसतीगृह, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, (उस्मानाबाद)-200, उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी कॉलेज मुलींचे वसतीगृह, शासकीय विश्रामगृह (उमरगा) 70, लोहारा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (लोहारा) 100, भूम येथील एस. पी. कॉलेज मुलींचे वसतीगृह (भूम) 42, परंडा येथील संत मीरा पब्लिक स्कूल, सोनारी रोड (परंडा) 100, कळंब येथील सोजर मतिमंद मुलांचे वसतीगृह, येरमाळा रोड (कळंब) 40, कळंब येथील रायगड मंगल कार्यालय, ढोकी रोड, (कळंब) 105, वाशी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे मुलीचे वसतिगृह (जुनी इमारत),तपोवन जवळ(वाशी) 90 अशा एकूण 747 बेडची व्यवस्था होणार आहे.

    जिल्हा शल्य चिकीत्सक, आणि जि.प.च्या व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी त्यांना दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार यंत्रणा स्थापन करुन या केंद्रावर सनियंत्रण करावे, तसेच याबाबतची माहिती डॅशबोर्डवर अद्ययावत करण्यात यावी.या सर्व कोविड केंद्रावर सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी तातडीने करावी. नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची माहिती जिल्हाधिकारी जि.प.चे  कार्यालयास आणि संबंधित इन्सीडंट कमांडर यांना देण्यात यावी. सर्व केंद्रावर नियंत्रण करण्याची सर्वसाधारण जबाबदारी व DCCC चे नोडल अधिकारी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी पाहणार आहेत.स्थानिक पातळीवर DCCC ला वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करुन देणे, तेथे नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून काम करुन घेणे व आवश्यक तो औषध पुरवठा करुन घेणे ही जबाबदारी संबंधित वैद्यकीय अधीक्षकांची (M.S.) यांची राहील,असेही या आदेशात म्हटले आहे.

                                     
 

From around the web