ई-पीक पाहणीचे काम वानेवाडी येथे शंभरटक्के      

 
d

 उस्मानाबाद - ई पीक पहाणी या अभियानामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील वानेवाडी येथील 331 शेतकऱ्यांनी शंभर टक्के ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून पूर्ण करुन 100 टक्के कामकाज केले आहे. वानेवाडी हे उस्मानाबाद जिल्हयातील पहिले गाव ठरले आहे.

    यामध्ये नायब तहसीलदार तुषार बोरकर,मंडळ अधिकारी ए.बी.तिर्थकर,मंडळ कृषी अधिकारी श्री.देशमुख,कृषी सहाय्यक वैभव प्रभाकर लेनेकर आणि तलाठी आर.बी.पाटील यांनी उत्कृष्ट काम केले.तसेच कोंड (ता.उस्मानाबाद) येथे 1950 शेतकरी खातेदारांपैकी 1311 खातेदारांनी पीक पाहणी पूर्ण करुन चार आकडी नोंदणी पूर्ण करण्याचे उत्कृष्ट कार्य केले.यामध्ये कृषी सहाय्यक श्रीमती संगीता भारतराव लाड आणि तलाठी बी.एस.लाकाळ यांनी उत्कृष्टी कामकाज गावातील तरुण युवकांच्या मदतीने केले.

From around the web