रेल्वे प्रश्न शक्य तितक्या वेगाने मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील - खा. ओमराजे निंबाळकर

शिवसैनिकांची तुळजापुरात महाआरती
 
s

 उस्मानाबाद -  २०१४ मध्ये लोकसभेच्या प्रचारा निमित्त तुळजापूरात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या तुळजापूर रेल्वेमार्गासाठी आपण क्य तितक्या वेगाने काम करून हा प्रश्‍न सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन मार्गी लावणार असल्याचे तुळजापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

      तुळजाभवानी मंदिरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत सुधारणा व्हावी याकरिता जिल्ह्यातील शिवसेनेच्या वतीने महाआरती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला तुळजापूर रेल्वेने जोडावे यासाठी आपण दर महिन्याला महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन आढावा घेत आहोत या रेल्वे मार्गातील भूसंपादनाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे ६० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच महत्त्वाची प्रक्रिया होते आणि त्यासाठी आपण स्वतः इतर लोकप्रतिनिधींच्या मदतीने हे काम शक्य तेवढ्या वेगाने करण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे सांगितले.
     तुळजाभवानी मंदिरातील दर्शनानंतर मंदिर संस्थान समितीच्या कार्यालयात व्यवस्थापक योगिता कोल्हे महसूलचे उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांच्याशी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर,आमदार कैलास पाटील, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

    मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने भाविकांची गरज आणि सोय याकडे साफ दुर्लक्ष असल्या संदर्भात खासदारांनी समितीच्या कामकाजासंदर्भात नाराजी व्यक्त केली तसेच यापुढील काळात मंदिर समितीने स्वतःचे कायदे भाविका वर न लागता भाविकांची गरज काय आहे हे ओळखून मुख्य दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था तात्काळ अंमलबजावणी करावी असे आदेश बैठकीत दिले. आणि त्यानंतर लागलीच या आदेशाची अंमलबजावणी देखील मंदिरात सुरू झालेली आहे.भाविकांना आता मुखदर्शन सोय उपलब्ध झालेली आहे.

     सर्व लोकप्रतिनिधी समवेत महसूल अधिकाऱ्यांनी एक समान वागणूक द्यावी,स्वतःच्या मर्जीने सपत्नीक वागणूक देऊ नये.असे देखील खासदार राजेनिंबाळकर, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी तुळजाभवानी मंदिर समितीच्या अध्यक्षा योगिता कोल्हे आणि उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांना बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेत सुनावले.

शिवसैनिकांची तुळजापुरात महाआरती

 मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वरील शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रकृतीत सुधारणा व्हावी. याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तुळजापूर येथे आई तुळजाभवानी मंदिरात महाआरती करण्यात आली.

      मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेच्या मणक्याची शस्त्रक्रिया रिलायन्स रूग्णालय मुंबई येथे यशस्वी झाली आहे. या शस्त्रक्रिया साठी बुधवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्यावर पुढील आठवड्यामध्ये फिजियोथेरेपी करण्यात येणार आहे ते या आजारातून लवकर बरे होऊन जनसेवेत यावे यासाठी उस्मानाबाद जिल्हा शिवसेनेकडून महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी मंदिरात आज दिनांक १३ नोव्हेंबर रोजी महाआरती करण्यात आली यावेळी शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शामल वडणे उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते शहर प्रमुख संजय मुंडे माजी शहर प्रमुख प्रवीण कोकाटे तुळजापूर शिवसेनेचे शहर प्रमुख सुधीर कदम शिवसेनेचे गटनेते सोमनाथ गुरव बाळासाहेब काकडे पंकज पाटील अमीर शेख  दिलीप जावळे पंचायत समिती सदस्य गजेंद्र जाधव अभिजीत पतंगे सुधीर चव्हाण गोविंद कोळगे साबिर सय्यद अतिक सय्यद  यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

From around the web