डॉ. सचिन देशमुख ठरले जिल्हयातील पहिल्या लसीचे लाभार्थी

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत पहिल्या लाभार्थ्यांस लस 
 
डॉ. सचिन देशमुख ठरले जिल्हयातील पहिल्या लसीचे लाभार्थी

उस्मानाबाद - येथील जिल्हा सामान्य रुग्णालय कोरोना प्रतिबंध लसीकरणाचा प्रारंभ खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. पहिल्या लसीचा मान डॉ.सचिन देशमुख यांना मिळाला.

गेल्या मार्च 2020 पासून कोरोनाच्या सावटाखाली आपण होतो.त्या आजारावर जिल्हयातील जनता वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी,डॉक्टर्स, आरोग्य सेवेतील अधिकारी –कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींच्या सहकाऱ्यातून मात करण्यात मोठया प्रमाणात यश मिळविले आहे, आता कोरोनाची लस आल्याने कोरोनाच्या संकटाला आपण सामोरे जाऊ शंकतो, असे प्रतिपादन खासदार राजेनिंबाळकर यांनी यावेळी औपचारिक रित्या बोलताना केले.

यावेळी आमदार कैलास घाडगे-पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद निंबाळकर, आय.एम.एचे राज्य अध्यक्ष डॉ.राधाकृष्ण लोंढे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. के. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच. व्ही.वडगावे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बोडके, जिल्हा बाल आरोग्य तथा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी आदी उपस्थित होते.

कोरोनाची पहिली लस परिचारिका अर्चना डोके यांनी डॉ.सचिन देशमुख यांना दिली.त्यानंतर डॉ. कैलास गिलबिले यांना लस दिली.लसीची मात्रा फॅईट पाच एवढी आहे. जिल्हयास दहा हजार पन्नास लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. जिल्हयात आजपासून तीन ठिकाणी कोरोना लस देण्यास प्रारंभ झाला आहे. कोविन ॲपवर नोंद झालेल्या आठ हजार दोनशे सदोतीस जनाना पहिल्या टप्यात लस देण्यात येणार आहे. यात प्रामुख्यांने शासकीय व खाजगी सेवेतील आरोग्य सेवेशी संबंधित डॉक्टरांसह संबंधित कर्मचाऱ्यांचा तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा समावेश आहे.

आज प्रथम लस घेतलेल्या डॉक्टर देशमुख आणि डॉक्टर गिलबिले यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.गेल्या मार्च महिन्यापासून जगातील जनतेला रडवणारा कोरोना त्यांच्या प्रतिबंधाची लस आल्याने आता रडतो आहे, अशयाशी रागोळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिकांनी रुग्णालयाच्या प्रवेशव्दारा समोर काढली होती. ही रागोळी येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. आज प्रत्येक केंद्रावर 100 जणांना लस देण्यासाठी बोलावण्यात आले आहे.

From around the web