उस्मानाबाद जिल्ह्यात २३ लसीकरण केंद्रावर मिळणार कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड लसीचा डोस
उस्मानाबाद - २३ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या पुढील नागरिकांना कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट व मतदाता कार्ड यापैकी कोणतेही एक ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या पुढील वयोगटातील नागरिक, जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. तसेच ज्या १८ वर्षाच्या पुढील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार आहे.
ग्रामीण रुग्णालय पुढीलप्रमाणे -
मुरूम ,वाशी ,भूम ,लोहारा ,सास्तूर, तेर या केंद्रावर कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात येणार आहे. (पहिला डोस घेऊन किमान २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दुसरा डोस)
उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, उमरगा, कळंब, परंडा जिल्हा रुग्णालय ,उस्मानाबाद, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद ही आहेत. तर ११ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या पुढील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. तसेच ज्या १८ वर्षाच्या पुढील लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार आहे.
लसीकरण केंद्र पुढीलप्रमाणे -
जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर, उमरगा, कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस (पहिला डोस घेऊन किमान ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दुसरा डोस), जिल्हा परिषद प्रशाला, उमरगा, फुले आंबेडकर वाचनालय, कळंब,जुने पोस्ट ऑफिस चोंदे गल्ली, कळंब,नगर परिषद शाळा क्र. ३, तुळजापूर, सिद्धीवाल कॉम्प्लेक्स, करमाळा रोड, परंडाडॉ. गायकवाड हॉस्पिटल, मंगळवार पेठ, परांडा, किंग कोब्रा गणेश मंडळ, हिरकणी हॉल, लोहारा, जि.प.प्रा .शाळा शिवशक्ती नगर ,वाशी, रविंद्र हायस्कूल ,भूम, जि .प .विशेष शाळा, मुरूम या केंद्रावर लसीकरण केले जाणार आहे.
लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगर पालिका व पोलिस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी. तर उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे व जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.