सोलापूरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांच्यावर धाराशिवमध्ये गुन्हा दाखल 

समर्थनगरमधील खासगी हॉस्पिटल आणि बंगल्याचे बांधकाम अनधिकृत 
 
s

 धाराशिवचे तत्कालीन आणि  सोलापूरचे विद्यमान  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय केशवराव पाटील यांच्यावर धाराशिवच्या आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समर्थनगरमध्ये  खासगी हॉस्पिटल आणि बंगल्याचे  बांधकाम करताना पालिकेच्या नियम आणि अटींचे पालन केले नाही तसेच नियमापेक्षा जास्त बांधकाम केले म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

डॉ. धनंजय पाटील यांचे समर्थनगर , वरुडा रोडवर खासगी हॉस्पिटल आणि बंगला आहे. तळमजल्यावर हॉस्पिटल आणि वरती बंगला बांधण्यात आला  आहे.   त्याचे बांधकाम करताना नगर पालिकेकडून परवाना घेण्यात आला पण नियम, अटीं आणि शर्तीचे  पालन कऱण्यात आले नाही. 

या हॉस्पिटलसाठी फ्लोअर स्पेस इंडेक्स (FSI) म्हणजे एफएसआय  ( चटई क्षेत्र ) सोडण्यात आले नव्हते, पार्किंगसाठी जागा सोडण्यात आली नाही तसेच नगर पालिकेकडून काम पूर्णत्वाचा दाखला घेतलेला नव्हता,. त्याची तक्रार सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी नगर पालिकेकडे केली असता, पालिकेने डॉ. धनंजय केशवराव पाटील यांना नोटीस बजावली होती. 

या नोटीसचे डॉ. धनंजय केशवराव पाटील यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. अखेर मुख्याधिकारी वसुधा फड यांच्या आदेशानुसार लिपिक गोरख रणखांब यांनी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये डॉ. धनंजय केशवराव पाटील यांच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी फिर्याद दिली असता, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचना अधिनियम १९६६ च्या ५३ ( ७ )  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

धाराशिव मध्ये अनेक डॉक्टरनी शहरात मोठंमोठे हॉस्पिटल बांधले आहेत, पण त्याचे बांधकाम करताना पालिकेने दिलेल्या नियम आणि अटींचे पालन केले नाही. त्याच्या तक्रारी लवकरच दाखल करणार असल्याचे, सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी सांगितले

s

s

 

From around the web