उस्मानाबाद जिल्ह्यातील ३६ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या
Aug 30, 2021, 21:55 IST

उस्मानाबाद - जिल्ह्यातील ३६ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदलीचा आदेश पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी आज काढला आहे. त्यात पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.
कळंबचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांची उस्मानाबाद येथे आनंदनगर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे तर कळंब पोलीस स्टेशनला यशवंत जाधव योनीची नेमणूक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. भुजबळ यांची उमरगा येथे बदली करण्यात आली आहे. सपोनि पी. आर. तायवाडे यांची नळदुर्ग पोलीस स्टेशनला नेमणूक करण्यात आली आहे.