तीस शिक्षकांना तालुकास्तरीय पुरस्कारांचे वितरण
तुळजापूर - शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबविणार्या तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेतील ३० शिक्षक-शिक्षिकांना तालुकास्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पंचायत समितीच्या गटशिक्षण कार्यालयाने कोरोनामुळे स्थगित ठेवलेल्या मागील दोन वर्षांचेही पुरस्कार या कार्यक्रमात वितरीत केले.
गटशिक्षण कार्यालयामार्फत आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, जिल्हा परिषद सदस्या अर्चना पाटील, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, पंचायत समिती सभापती रेणुका इंगोले, उपसभापती दत्तात्रय शिंदे, सदस्य चित्तरंजन सरडे, गटविकास अधिकारी प्रतापसिंह मरोड, अर्जुन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यामध्ये प्राथमिक विभागाचे २८ व माध्यमिक विभागाचे दोन, अशा एकूण ३० शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले. प्रारंभी मसला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत व देशभक्तीवर गीत गायन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यासाठी शिक्षिका तांबे यांनी परिश्रम घेतले.
प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी अर्जून जाधव यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षिका श्रीमती खकडकीकर व विठ्ठल नरवडे यांनी केले. आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी मल्हारी माने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी जी. एन. सर्जे, डॉ. वाय. के. चव्हाण, एम. एस. काळे, एस. एम. राऊत, डी. एस. शिंदे, केंद्र प्रमुख आर. सी. भोसले, टी. आय. महाजन, ए. एस. स्वामी, एस. डी. हुंडेकरी, एस. व्ही. सोलनकर, आर. बी. वाघचौरे, पी. के. राठोड, आलुरे, अंगुले, वाले, गायकवाड, सुरवसे आदींनी परिश्रम घेतले.
पुरस्करप्राप्त शिक्षक
गोविंद कन्हाळे, नीता लोखंडे, राजू गायकवाड, राजेंद्र नारायणकर, सचिनकुमार ढेप, जनाबाई वाघमारे, अश्विनी वाघमारे, दगडू जोडभावे, मीना बनसोडे, शंकरराव तांबट, सुधीर डोलारे, बळीराम कोरे, दिनकर कदम, अनिता जांबळे, गणेश तनपुरे, सन २०२०-२१ मधील पुरस्कारप्राप्त शिक्षक ः भाग्यश्री वसंतराव कावरे, विशाल अंधारे, बाबू चंदू चव्हाण, सहदेव बाबुराव माळी, सुरेखा राठोड, मनोज चौधरी, नारायण वाघमारे, किसन जावळे, महादेव सिध्दलिंग स्वामी, श्रीशैल्य स्वामी, ज्योती वळसे, लक्ष्मण कोलते, अकबर मुलाणी, उत्तरेश्वर पैकेकर, शिवाजी राठोड.