भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक दिलीप मोरे यांच्यावर शिस्तभांगाची कारवाई होणार 

धाराशिव शहरातील कुरणे नगर मध्ये लागले भ्रष्टाचाराचे 'कुरण' 
 
s

धाराशिव - शहरातील कुरणे नगर मधील सर्वे नंबर २०/३ मधील गटाची ईटीएस मोजणी करून अहवाल देण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक दिलीप मोरे यांना दिला होता, परंतु मोरे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवली. 

याप्रकरणी आपणाविरुद्ध शिस्तभांगाची कार्यवाही का करू नये ? अशी कारणे दाखवा नोटीस वाजवली असता, मोरे यांनी या नोटिसीला उत्तर दिले नाही. त्यामुळे शासकीय कामात हयगय आणि दिरंगाई केल्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक दिलीप मोरे यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची शिफारस उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळे मोरे यांचे धाबे दणाणले आहेत. 

सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी या प्रकरणी उप विभागीय अधिकारी, धाराशिव यांच्याकडे तक्रार केली असता, या तक्रारीची दखल घेऊन मोरे यांच्यावर कार्यवाही होत आहे, हे विशेष . 


काय आहे प्रकरण ? 

सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की , धाराशिव शहरातील  कुरणेगरनगरमधील सर्वे नंबर २०/३ मध्ये जनाबाई बब्रुवान बलंवडे यांचे नावे ०.५३.२४ हेवढे क्षेत्र असुन सदर क्षेत्रामध्ये असलेल्या डोंगरातील बब्रुवान गुंडाजी बलंवडे यांनी शासनाच्या विना अनुमती अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणावर मुरुम उत्खनन करुन त्याची बाजार भावाने विल्हेवाट लावली आहे व अर्जदार अर्जुन नागू चौगुले यांच्या नावे सर्वे नंबर २०/३ किंवा गट नंबर १२१/२ मध्ये कुठल्याही प्रकारचे क्षेत्र नाही. त्यामुळे गट नंबर २०/३ मधील क्षेत्राचे जनाबाई बब्रुवान बलंवडे यांच्या विना अनुमती सपाटीकरण करुन उर्वरीत मुरुम गट नंबर २०/३ मधून गट नंबर १२१/२ पर्यत प्लॉटींग रस्ते बनवण्यासाठी जेसीबी/पोकलेन व टिपरच्या साह्याने वाहतुक करण्यासाठी ५० ब्रास मुरुमाची त्रयस्थ अर्जदार अर्जुन नागू चौगुले यांनी परवानगी मागितल्याचे दिसून येते. वास्तविकत: त्रयस्त व्यक्तीने परवानगी मागणे उचित नाही. तसेच श्री. चौगुले यांच्या अर्जावर असलेली तारीख व तहसिल कार्यालयात आवक झालेली तारीख यामध्ये तफावत दिसून येते. तसेच दि. ११/०६/२०२२ रोजी पकडलेल्या डंपरवर गौणखनिज धोरणानुसार कारवाई केल्याचे दिसून येत नाही. 

बब्रुवान गुंडाजी बलवंडे यांनी त्यांचे मौजे उस्मानाबाद येथे जमिन सर्वे नंबर २०/०३ मध्ये १ हेक्टर २६ आर जमिन असुन सदर जमिनीमध्ये टेकडी व सपाट जमिन आहे. सदर जमिनीचे मला सपाटीकरण करणे आवश्यक असल्याने  सदर जमिनीचे सपाटीकरण करणेबाबत रॉयलटी भरून परवानगी मिळणे संदर्भात दिनांक २०/०६/२०२२ रोजी तहसिलदार, उस्मानाबाद यांना अर्ज दिला असून सदर अर्जावर्ती गणेश तानाजी माळी तत्कालीन तहसिलदार, उस्मानाबाद यांनी गौण खनिज असे पृष्टांकीत करुन दिनांकीत स्वाक्षरी केली आहे. परंतु सदरचा अर्ज हा उस्मानाबाद तहसिलच्या आवक रजिस्टर मध्ये नोंद झाल्याचे दिसून येत नाही. परंतु सदरचा अर्ज हा लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक २१/०६/२०२२ रोजी संबंधित कार्यासनाच्या महसूल सहाय्यक यांनी टिपणी द्वारे मंडळ अधिकारी व तलाठी, उस्मानाबाद (शहर) यांना द्यावयाच्या प्रारुप पत्रासह प्रस्तावित केले असता सदर प्रस्तावित टिपणीसह प्रारुप पत्रावरती दिनांक २१/०६/२०२२ रोजी नायब तहसिलदार (महसूल) व तहसिलदार यांची स्वाक्षरी होऊन निर्गमीत झाले आहे. परंतु सदर निर्गमीत झालेल्या पत्राचे अवलोकन केले असता त्यावरती कावी नंबर नाही. तसेच सदरचे पत्र हे उस्मानाबाद तहसिलच्या जावक रजिस्टर मध्ये नोंद झाल्याचे दिसून येत नाही. ही अत्यंत गंभीर स्वरुपाची बाब आहे.

             मौजे उस्मानाबाद येथील बार्शी रोड, कुरणे नगर येथे कार्यवाही करण्यास गेलो असता सदरील ठिकाणी उत्खनन केलेले दिसून आले. सदरील उत्खना बाबत चौकशी केली असता उत्खनन हे श्री. बब्रुवान बलवंडे यांच्या क्षेत्रातील टेकडीचे केल्याचे दिसून आल्याचा बी. के. रोडगे व बी. व्ही. डोके तलाठी तसेच मंडळ अधिकारी यांचे पथकाने दिनांक १३/०३/२०२२ रोजी केलेल्या पंचनाम्यात नमुद केले आहे. तर अर्जदार बब्रुवान गुंडाजी बलवंडे यांनी त्यांचे नावे असलेली कसबे उस्मानाबाद येथिल जमीन सर्वे नंबर २०/३ क्षेत्र १ हेक्टर २६ आर मधील टेकडीचे सपाटीकरण करणेस परवानगी मागणी केली असून या अनुषंगाने प्रत्यक्ष पहाणी केली असता सदर क्षेत्रातून या पुर्वी उत्खनन झाल्याचे दिसून येते. असा पंचनाम्यासह दिनांक २८/०६/२०२२ रोजी मंडळ अधिकारी, उस्मानाबाद (शहर) यांनी तहसिलदार उस्मानाबाद यांना अहवाल सादर केला आहे. त्यामुळे प्रकरणात गणेश तानाजी माळी तत्कालीन तहसिलदार, उस्मानाबाद यांच्यासह संबंधित नायब तहसिलदार (महसूल) व महसूल सहाय्यक तसेच तलाठी व मंडळ अधिकारी यांनी बब्रुवान गुंडाजी बलवंडे तसेच अर्जुन नागू चौगुले यांच्याशी संगनमत व आर्थिक हितसंबंध जोपासून एकीकडे कुठलाही दंड न करता वाहन सोडून दिले तर दुसरीकडे अवैध उत्खनन करणाऱ्यावर कुठलीही कार्यवाही न करता तसेच उत्खनन करण्यासाठी पर्यावरण अनुमती सादर केली नसताना तसेच उत्खनन व सपाटीकरण कशासाठी करावयाचे आहे, याचे कुठलेही सबळ कारण संबंधीत अर्जदार यांनी त्यांचे अर्जात नमुद केले नसताना देखील त्यांच्याकडून कुठलीही रॉयलटी भरून न घेता त्यांना गणेश तानाजी माळी तत्कालीन तहसिलदार उस्मानाबाद यांनी नियमबाह्य व बेकायदेशीररित्या टेकडीचे उत्खनन करुन सपाटीकरण करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रकरणात शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. म्हणून प्रकरणात सक्षम प्राधिकाऱ्याकडून झालेल्या उत्खननाचे अनुमान काढून सर्व संबंधीत दोषी विरुद्ध कठोर व कायदेशीर कार्यवाही करावी.

From around the web