दिल्ली येथील पीडीआयएल कंपनीच्या संचालकपदी धाराशिवचे अ‍ॅड. मिलिंद पाटील यांची निवड

 
D

धाराशिव-  महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष तथा धाराशिवचे सुपुत्र अ‍ॅड.मिलिंद पाटील यांची केंद्र सरकारअंतर्गत दिल्ली येथील प्रोजेक्ट अ‍ॅन्ड डेव्हलपमेन्ट  (पीडीआयएल) कंपनीच्या संचालक पदी निवड झाली आहे. अ‍ॅड.मिलिंद पाटील यांच्या रुपाने धाराशिव जिल्ह्याला आणखी एक बहुमान प्राप्त झाला आहे. या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

सध्या दिल्ली येथे स्थित असलेल्या पीडीआयएल कंपनीची 1951 मध्ये फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची तंत्रज्ञान शाखा म्हणून सुरुवात झाली होती, त्यानंतर 1978 साली फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या पुनर्रचनेनंतर एफपीडीआयएल नावाची एक वेगळी संस्था म्हणून ओळखली जाऊ लागली. सन 1981 मध्ये कंपनीचे पीडीआयएल असे नामकरण करण्यात आले. केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली सुरू असलेली पीडीआयएल ही प्रकल्प व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी सल्लागार कंपनी आहे. जी खते आणि संबंधित रासायनिक, तेल आणि वायू उद्योगांसाठी सेवा देते.

पीडीआयएल कंपनी संचालक पदाच्या माध्यमातून अ‍ॅड.मिलिंद पाटील यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या या निवडीचे जिल्हाभरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, विधिज्ञ क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले असून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

From around the web