फळपिकांच्या विम्याबाबत कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

 
s

 उस्मानाबाद -  हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना पुढील तीन वर्षासाठी राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. उस्मानाबाद जिल्हयासाठी मृग बहारात मोसंबी, चिकू, डाळींब, सीताफळ आणि लिंबू या पीकांचा समावेश आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी हा विमा ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घ्यावयाचा नसेल तर कर्ज घेतलेल्या अधिसुचित पिकांकरीता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधीपर्यंत संबंधित बँकेस विमा हप्ता कपात न करण्याबाबत घोषणापत्र देणे आवश्यक आहे.जे कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होण्याबाबत घोषणापत्र  देणार नाहीत.त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.

   या योजने अंतर्गत कमी पाऊस,पावसाचा खंड,जास्त तापमान,सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून संरक्षण मिळणार आहे.योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे.बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अर्जसोबत आधार कार्ड, 7/12 उतारा, फळबागेचा अक्षांश-रेखांश सह फोटो आणि बँक पासबूकची प्रत इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. पुढीलप्रमाणे विमा हप्ता रक्कम भरुन पीक संरक्षित करणे आवश्यक आहे. फळपिकांचे नावं, विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी,विमा हप्ता रक्कम रुपये प्रती हेक्टरी (शेतकरी हिस्सा),विमा हप्ता भरण्याचा अंतिम दिनांक  असा आहे.

     फळपिकांचे नावं- मोसंबी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 80 हजार रुपये असून विमा हप्ता रक्कम रुपये प्रती हेक्टरी (शेतकरी हिस्सा) 8400 रुपये आहे. विमा हप्ता भरण्याचा अंतिम दि. 30 जून 2021 पर्यंत आहे. चिकू- विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी  60 हजार रुपये असून विमा हप्ता रक्कम रुपये प्रती हेक्टरी (शेतकरी हिस्सा) 4200 रुपये आहे. विमा हप्ता भरण्याचा अंतिम दि.30 जून 2021 पर्यंत आहे.डाळींब- विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी    13 हजार रुपये असून विमा हप्ता रक्कम रुपये प्रती हेक्टरी (शेतकरी हिस्सा)   6500 रुपये आहे. विमा हप्ता भरण्याचा अंतिम दि.14 जुलै 2021 पर्यंत आहे. लिंबू- विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी  70 हजार रुपये असून विमा हप्ता रक्कम रुपये प्रती हेक्टरी (शेतकरी हिस्सा) 10500 रुपये आहे. विमा हप्ता भरण्याचा अंतिम दि.30 जून 2021 पर्यंत आहे. पेरु- विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी  60 हजार रुपये असून विमा हप्ता रक्कम रुपये प्रती हेक्टरी (शेतकरी हिस्सा) -3300 रुपये आहे. विमा हप्ता भरण्याचा अंतिम दि.30 जून 2021 पर्यंत आहे. सीताफळ - विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी  55  हजार रुपये असून विमा हप्ता रक्कम रुपये प्रती हेक्टरी (शेतकरी हिस्सा)2750 रुपये आहे. विमा हप्ता भरण्याचा अंतिम दि.31 जुलै-2021.

हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना मृग बहारासाठी फळपिकनिहाय अधिसूचित महसूल मंडळे

फळपीकांचे नाव,अधिसूचित तालुके,अधिसूचित महसूल मंडळे पुढीलप्रमाणे आहे :-

मोसंबी- अधिसूचित तालुके उस्मानाबाद अधिसूचित महसूल मंडळे -उस्मानाबाद ग्रा., पाडोळी, तेर, ढोकी, जागजी.कळंब-शिराढोण. चिकू- अधिसूचित तालुके परंडा अधिसूचित महसूल मंडळे परंडा, आसु, जवळा नि.,आनाळा, सोनारी. भूम- माणकेश्वर. डाळींब व सीताफळ :-जिल्हयातील सर्व तालुके, उस्मानाबाद-जिल्हयातील सर्व महसूल मंडळे. लिंबू- अधिसूचित तालुके तुळजापूर अधिसूचित महसूल मंडळे सावरगाव. परंडा अधिसूचित महसूल मंडळे परंडा, आसु, आनाळा, सोनारी. पेरु-उस्मानाबाद - अधिसूचित महसूल मंडळे उस्मानाबाद ग्रा.,बेंबळी,केशेगाव,पाडोळी,तेर, ढोकी, जागजी. तुळजापूर- अधिसूचित महसूल मंडळे तुळजापूर- तालुक्यातील सर्व महसूल मंडळे. कळंब- अधिसूचित महसूल मंडळे -कळंब तालुक्यातील सर्व महसुल मंडळे.उमरगा- अधिसूचित महसूल मंडळे उमरगा-तालुक्यातील सर्व महसुल मंडळे. परंडा- अधिसूचित महसूल मंडळे परंडा- तालुक्यातील सर्व महसुल मंडळे भूम- अधिसूचित महसूल मंडळे -माणकेश्वर,भूम, वालवड, ईट लोहारा- अधिसूचित महसूल मंडळे - लोहारा- तालुक्यातील सर्व महसुल मंडळे. वाशी- अधिसूचित महसूल मंडळे -वाशी-तालुक्यातील सर्व महसूल मंडळे.

  महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग घेता येईल.संबंधित मंडळातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घ्यावा,असे अवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.उमेश घाटगे यांनी केले आहे.शेतकऱ्यांनी अधिक माहीतीसाठी PMFBY.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा किंवा नजिकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

From around the web