अणदूर अत्याचार प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर तीन नराधमांनी २७ जानेवारी रोजी सामूहिक अत्याचार केला होता.१४ दिवस झाले तरी या प्रकरणतील तिसऱ्या आरोपीस पोलिसांनी अद्याप अटक केली नाही. त्यामुळे संतप्त लिंगायत समाज बांधवानी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन करून, आरोपीच्या अटकेची मागणी केली.
अणदूर येथील नववीत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर दि.२७ जानेवारी रोजी तीन नराधमांनी नियोजनपूर्वक प्लॅनिंग करून तिला जबरदस्तीने उचलून नेले आणि रात्रभर तिच्यावर पाशवी अत्याचार केला होता. . याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तिसरा आरोपी १४ दिवस झाले तरी फरार आहे.
तिसऱ्या आरोपीला तात्काळ अटक करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून सर्व आरोपीना कडक शिक्षा करावी आणि पीडितेला न्याय द्यावा या मागणीसाठी अणदूर येथे दोन वेळेस तर नळदुर्ग येथे एक दिवस बंद कडकडीत बंद पाळण्यात आला होता. तसेच नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले , त्यानंतर महिलांनी देखील अणदूरमध्ये निषेध मोर्चा काढला होता. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षकांना देखील याबाबत शिष्टमंडळ भेटले असून त्यांनी केवळ आश्वासन देण्यापलीकडे कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे पोलीस यंत्रणा जाणीवपूर्वक आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांनी तिसऱ्या आरोपीस तात्काळ अटक न केल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी लिंगय्या स्वामी, शिवाप्पा बताले व श्रीराम मुंबरे यांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनावर ॲड. दिपक आलुरे, लिंगय्या स्वामी, विठ्ठल खरे, गणेश पाटील, वैशाली शिवाजी स्वामी, बलभीम पाटील, प्रफुल्लकुमार शेटे, चंद्रशेखर कंदले, शिवकुमार स्वामी, वैजिनाथ गुळवे, ॲड सुधीर तानवडे, संजय बताले, मुजीब मौजन, शिवय्या बताले, विजय डुकरे, महेश करपे, एम के माने, लक्ष्मण लंगडे, अनिल बंदपट्टे, शिवाजी स्वामी, सिद्धेश्वर मुडके, श्रमिक पोतदार, अक्षय महाजन, नरेश पाटील, किशोर महाजन, बाळासाहेब पाटील, शरण पाटील, श्रीराम मुंबरे, ऋषिकेश चपने आदींच्या सह्या आहेत.
Video