बीडच्या लोकाशा दैनिकात परिचारिकांची बदनामी 

दैनिकाच्या विरुद्ध उस्मानाबादेत निदर्शने 
 
s
मालक,  संपादक विजय बंबवर गुन्हा दाखल करण्याची मागणी 

उस्मानाबाद  - बीडच्या लोकाशा दैनिकात परिचारिकांची बदनामी करणारा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता, त्याच्या निषेधार्थ उस्मानाबादेत जिल्हा शासकीय रुग्णालयात परिचारिकांनी काम बंद आंदोलन करून रुग्णालयांसमोर निदर्शने केली तसेच दैनिकाचे संपादक विजय बंबवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.


दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, दि.३० जुलै रोजी बीड येथून प्रकाशित होणाऱ्या लोकाशा  दैनिकाच्या वृत्तपत्रात क्रॉसलाईन या सदराखाली महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशातील किंबहुना जागतिक पातळीवर काम करणाऱ्या परिचारिका या संवर्गावर चारित्र्यहनन करून त्यांच्या अब्रूचे धिंडवडे काढण्याचा प्रयत्न संपादक व पत्रकार या दोघांनी केलेला आहे. 

  जागतिक महामारी कोरोना युद्धामध्ये व जागतिक नैसर्गिक आपत्तीमध्ये व वेगवेगळ्या देशांमध्ये नैसर्गिक जीवित हानीमध्ये अपघातग्रस्त व गंभीर जखमी झालेल्या जीवाची काळजी घेऊन त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करून धीर देऊन त्यांची रुग्णसेवा व शुश्रुषा करण्याचे दैवी काम करण्याची जबाबदारी संपूर्ण परिचारिका संवर्गाची आहे हे सर्व जगाने मान्य केलेले आहे. समाजामध्ये काम करीत असताना सध्या बऱ्याच अमानवीय घटना घडत असतात. म्हणून हा त्या संपूर्ण समाजाचा दोष किंवा प्रसाद होत नाही  

  तसेच बीड येथील या वृत्तपत्रांमध्ये छापलेल्या वृताच्या क्रॉसलाईनमध्ये संपादकांनी संपूर्ण परिचारिका या संवर्गाचे व संवर्गातील महिलांची बदनामी करून संपादकांनी या संवर्गावर वैयक्तिक द्वेष व राग काढलेला दिसून येतो. तर असे वृत्त छापून भारतीय राज्य घटनेने दिलेल्या लेखन स्वातंत्र्याचे उल्लंघन केले असून संपूर्ण संवर्गावर लांछनास्पद टीका करणे हा गुन्हाच आहे. त्याबरोबरच समाजामध्ये सामाजिक द्वेष पसरविण्याचा निंदनीय प्रकार देखील आहे. 

यामुळे परिचारिकांच्या मानसिकतेचे खच्चीकरण झाल्यामुळे परिचारिकांची काम करण्याची मानसिकता राहिलेली नाही. तसेच त्या वृत्तपत्रात ७ वर्षांपूर्वी असाच विकृत लेख लिहिलेला होतात. त्यामुळे अशा विकृत पत्रकारावर व वर्तमानपत्रावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व त्या वर्तमान पत्रातील त्या विकृत पत्रकारावर गुन्हा नोंद करावा व त्यांची पत्रकारिता रद्द करण्यात यावी. अन्यथा राज्यातील सर्व परिचारिका मार्फत बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल व त्याची दखल न घेतल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे. 

या निवेदनावर महाराष्ट्र राज्य गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन संघटनेच्या अध्यक्ष नलिनी दलभंजन, उपाध्यक्ष संगीता चिरके, सचिव सुलभा भड,  खजिनदार प्रेमा निंबाळकर यांच्या सह्या आहेत.


 

From around the web