रेमिडीसिवरच्या मागणीत घट ... 

 
sd

उस्मानाबाद - आतापर्यंत कोरोनावर उपयोगी पडणारे ,पेशंटच्या नातलगांना दाही दिशा फिरवणारे, वाट्टेल त्या किंमतीला मिळणाऱ्या "रामबाण" रेमिडीसिवर इंजेक्शन्सचा "भाव"आता उतरला आहे.

सध्या रेमिडीसिवर इंजेक्शन्सचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे समजते. दहा दिवसांपूर्वी पर्यंत रेमिडीसिवर म्हणजे जीवनदान हाच समज होता.ज्या इंजेक्शन्ससाठी लोकांनी लाखो रुपये मोजले ते रेमिडीसिवर इंजेक्शन्स"आयसीएमआरने" कोरोना उपचारातून वगळले आणि  आपसूकच 
रेमिडीसिवरची मागणी कमी झाली आणि  ते आता सहज उपलब्ध होऊ लागले आहे.  

यापूर्वी कोविड रुग्णालयात व संलग्न औषधी दुकानांतच उपलब्ध असणारे ,जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणात वितरित होणारे रेमिडीसिवर आता सर्वच ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल असे बोलले जात आहे.

From around the web