दणका : दाऊतपूर ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारास  दोन - दोन निवडणूक चिन्ह

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याचे राज्य निवडणूक आयोगाने निर्देश 
 
s

उस्मानाबाद - तालुक्यातील दाऊतपूर येथील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारास दोन - दोन निवडणूक चिन्ह देणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर योग्य ती उचित कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल देण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. 

दाऊतपूर  ग्रामपंचायतीची निवडणूक जानेवारी २०२१ मध्ये झाली होती. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा विस्तार अधिकारी (शिक्षण) , जिल्हा परिषद, उस्मानाबाद बालाजी यरमुनवाड यांनी उमेदवारांना चिन्ह वाटप केल्यानंतर पुन्हा त्यात अदलाबदल केली होती. याबाबत उस्मानाबाद टुडेने वृत्त प्रसिद्ध केले होते. 

दाऊतपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सावळा गोंधळ

या प्रकरणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रार अर्जावरून जिल्हाधिकाऱ्यानी  उपविभागीय अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देश दिले होते.त्यानंतर अहवाल आल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाला याबाबत कळविण्यात आले होते. 

राज्य निवडणूक आयोगाने  दाऊतपूर येथील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारास दोन - दोन निवडणूक चिन्ह देणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर योग्य ती उचित कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल देण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

From around the web