नुकसान झालेल्या पिकांची माहिती 72 तासांच्या आत कळवावी

 
S

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील पाडोळी, सलगरा, ईटकळ, जळकोट, नळदुर्ग, परंडा, आसु, जवळा, आनळा, सोनारी, उमरगा, दाळींब, मुळज, लोहारा व माकणी या महसूल मंडळामध्ये दिनांक 10 जुलै 2021 रोजी अतिवृष्टी झालेली असल्यामुळे पीक विमा भरलेल्या पिकांचे नुकसान विमा संरक्षित क्षेत्र जलमय होऊन, ढगफुटी होऊन, पुराचे पाणी शेतात शिरुन, शेत दीर्घकाळ जलमय होऊन झाले असल्याने शेतकरी नुकसानीच्या सूचना देत आहेत.

 तसेच दिनांक 13 ते 15 जुलै 2021 रोजी ही मोठया प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्यता आहे. तेव्हां शेतकऱ्यांनी यापुढेही पीक विमा भरलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी व कृषी विभागास देणे बंधनकारक आहे.


 यामध्ये नुकसान काळविताना सर्वे नंबरनिहाय नुकसानग्रस्त क्षेत्रचा तपशील कळवणे आवश्यक आहे. प्राप्त झालेल्या सुचनेनंतर संयुक्त समितीमार्फत शेतकऱ्याच्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पहाणी करण्यात येईल. पीक विमा भरलेल्या ज्या पिकांचे नुकसान झाले आहे अशा पिकांच्या नुकसानीच्या सूचना शेतकऱ्यांनी गूगल प्ले स्टोअर वरून crop insurance किंवा विमा कंपनीचे Farmmitra हे ॲप डाऊनलोड करून त्या ॲपद्वारे आपल्या नुकसानीची माहिती द्यावी किंवा 18002095959 या टोल फ्री क्रमांकावर कळवावी तसेच संबंधित गावचे कृषि सहायक व तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाईन पध्दतीने देखिल अर्ज करून कळवू शकतात.

From around the web