कळंब शहरात पोलीसांनी पकडल्या बनावट नोटा 

एका आरोपीस अटक 
 
कळंब शहरात पोलीसांनी पकडल्या बनावट नोटा
बनावट नोटांचे लातूर कनेक्शन 

कळंब  -  कळंब शहरात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात कळंब पोलीसांना यश या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीस अटक केली आहे. या बनावट नोटांचे कनेक्शन लातूर असल्याची माहिती समोर आली आहे. 

कळंब शहरात बनावट नोटांचे रॅकेट गेल्या काही दिवसापासून कार्यरत  होते, पाचशे तसेच दोनशे रूपयांच्या नोटा चलनात  फिरू लागल्याने व्यापारी धास्तावले होते.  एका व्यापाऱ्याने कळंबचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांना बनावट नोटा बाजारात चलनात आल्याचे सांगितले होते. 

 पोलीसांनी सापळा रचून  असरफअली तायरअली सय्यद (वय २५ , बाबानगर , कळंब ) या आरोपीला पळून  जात असताना पकडले व त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५०० च्या 3 व 2०० रुपयाच्या पाच ड्युप्लीकेट नोटा मिळाल्या आहेत.

 पोलीसांनी घराची झडती घेतली असता आणखी पाचशे व दोनशेच्या ड्युप्लीकेट नोटा पोलीसांना मिळाल्या असून   कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.शुक्रवारी मध्यरात्री पोलीस निरिक्षक तानाजी दराडे,  पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी राऊत .एस एल. हांगे,  अमोल जाधव ,कुवळेकर ,.रेखा काळे ,यांनी ही कारवाई केली. 

बनावट नोटांचा बाजारात सुळसुळाट व्यापारी  धास्तावले


या बनावट रॅकेटचे धागेदोरे शोधण्यात पोलीसांना यश आले असेल तरी  यातील मुख्य सूत्रधार मात्र  पोलीसांच्या हाती लागला नाही. या रॅकेटचे लातूरशी कनेक्शनअसून  मुख्य आरोपीला पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान  उभे टाकले आहे.  शहरात मोठ्या प्रमाणात  ड्युप्लीकेट नोटा चलनात बाजारात फिरत असल्याने व्यापाऱ्यासह ग्राहक धास्तावले आहेत.

From around the web