कोरोनाचे थैमान : उस्मानाबाद जिल्ह्यात १५ एप्रिल रोजी ७६४ पॉजिटीव्ह, दहा मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या ५४३०
Thu, 15 Apr 2021

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.. आज १५ एप्रिल ( गुरुवार ) रोजी तब्बल ७६४ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ४८१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात दहा कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५४३० झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यू दर वाढल्याने घबराट पसरली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २७ हजार ८४४ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी २१ हजार ७४७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ६६७ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.