कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात १९ जानेवारी रोजी ३३४ रुग्णाची भर
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ११६१
Jan 19, 2022, 20:58 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनासोबतच ओमायक्रॉन रुग्णसंख्येतही भर पडली आहे. बुधवार दि.१९ जानेवारी रोजी एकूण ३३४ रुग्णाची भर पडली. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ११६१ झाली आहे.
आज पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णामध्ये उस्मानाबाद ११० , तुळजापूर २७, उमरगा ६०, लोहारा ४२, कळंब ३० , वाशी २८ भूम १२ , परंडा ३२५ असा समावेश आहे ,तसेच दिवसभरात ११२ रुग्ण बरे होऊन घरी परतले.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६९ हजार ६६१ रुग्ण आढळले असून , पैकी ६६ हजार ४०५ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत २०८५ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.