कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात २१ मार्च रोजी ११८ रुग्णाची भर, एकाचा मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या ८९६
Mar 21, 2021, 19:38 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात रवितावर दि.२१ मार्च रोजी नव्या ११८ कोरोना रुग्णाची भर पडली तर ३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ८९६ झाली आहे., तसेच दिवसभरात एका रुग्णाचा कोरोनाने बळी घेतला.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार ५८५ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १७ हजार ९९ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ५९० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर रिपोर्ट पाहा