उस्मानाबादेत कोरोना बाधित बालकांवर श्रीयश हॉस्पिटलमध्ये होणार उपचार

 
x

उस्मानाबाद - लहान मुलांना कोरोना विषाणूंची बाधा होत असल्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यासाठी उस्मानाबाद येथील श्रीयश हॉस्पिटलची कोविड हॉस्पिटल म्हणून स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे लहान बालकांना कोरोना विषाणूची बाधा झाल्यास या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येणार आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्गच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत भारत सरकार आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांचे कोविग पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी होते. परंतू दुसर्‍या लाटेत लहान मुले कोरोना पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे संदर्भ क्रमांक ४ अन्वये जिल्हा शल्य चिकित्सकांनी खालील नमूद केलेल्या खासगी रुग्णालयात कोविंड बाधा झालेल्या लहान मुलांना उपचारासाठी परवानगी देण्याबाबत विनंती केली आहे. 

जिल्ह्यात कोरोना विषाणू या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये व कोरोना संशयित केसेसमधील मार्गदर्शक सूचनांच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्राप्त अधिकारांचा वापर करून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ३३ आणि ६५ उस्मानाबाद जिल्ह्यातील खालील इमारती ठिकाणी आरोग्य विभागाच्या अधिनस्त म्हणून स्थापन करून पुढील आदेशापर्यंत अधिसूचित व अधिग्रहित केल्या आहेत. श्रीयस हॉस्पिटल, उस्मानाबाद (डॉ. सुधीर मुळे) या हॉस्पिटलमध्ये खाटांची संख्या २५ असून बाल रुग्णांची संख्या १९ आहे. तर जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद व जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी संदर्भ क्रमांक ३ मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार वरील यंत्रणा स्थापन करून संनियंत्रण करावे. 

सदरील माहिती डॅशबोर्डवर अद्यावत करण्यात यावी, चिल्ड्रन्स कोविड हॉस्पिटलमधील सुविधांमध्ये नियंत्रण करण्याची सर्वसाधारण जबाबदारी व डेडीकेट चिल्ड्रन्स कोविड सुविधांचे नोडल अधिकारी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे हे पाहणार आहेत. तर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय केंद्र सरकार व सार्वजनिक आरोग्य विभाग राज्य सरकार यांच्याकडून देण्यात आलेल्या व येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.

From around the web