कोरोना अपडेट न्यूज : उस्मानाबाद जिल्ह्यात १० मे रोजी ८३३ पॉजिटीव्ह, १४ मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६६९६
Updated: May 10, 2021, 20:06 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज १० मे (सोमवार) रोजी तब्बल ८३३ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ८३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात १४ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४५ हजार ५३१ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ३७ हजार ७८९ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १०४६ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६६९६ झाली