कोरोना अपडेट न्यूज : उस्मानाबाद जिल्ह्यात ९ मे रोजी ७१२ पॉजिटीव्ह, ८ मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६७०८
Sun, 9 May 2021

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज ९ मे ( रविवार ) रोजी तब्बल ७१२ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ९१४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात ८ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४४ हजार६९८ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ३६ हजार ९५८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १०३२ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६७०८ झाली आहे.