कोरोना अपडेट न्यूज : उस्मानाबाद जिल्ह्यात १३ मे रोजी ६२३ पॉजिटीव्ह, ८ मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६८१७
Thu, 13 May 2021

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज १३ मे ( गुरुवार ) रोजी तब्बल ६२३ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ७३१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात ८ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४७ हजार ३९९ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ३९ हजार ७७४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १०७८ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६८१७ झाली आहे .