कोरोना अपडेट न्यूज : उस्मानाबाद जिल्ह्यात १४ मे रोजी ४५८ पॉजिटीव्ह, १५ मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६१०७
Updated: May 14, 2021, 19:36 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज १४ मे ( शुक्रवार ) रोजी तब्बल ४५८ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ८८३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात १५ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४७ हजार ८५७ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ४० हजार ६५७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १०९३ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६१०७ झाली आहे .