कोरोना अपडेट : उस्मानाबाद जिल्ह्यात १७ मे रोजी ५४७ पॉजिटीव्ह, ७ मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५४५९
May 17, 2021, 20:53 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज १७ मे ( सोमवार ) रोजी तब्बल ५४७ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ७६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात ७ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४९ हजार ५०३ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ४२ हजार ९२३ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ११२१ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५४५९ झाली आहे .