कोरोना अपडेट : उस्मानाबाद जिल्ह्यात १६ मे रोजी ४९२ पॉजिटीव्ह,९ मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५६८७
May 16, 2021, 19:55 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज १६ मे ( रविवार ) रोजी तब्बल ४९२ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ६८७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात ९ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४८ हजार ९५६ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ४२ हजार १५५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १११४ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५६८७ झाली आहे .