कोरोना : लागोपाठ चौथ्या दिवशी दोन रुग्णाचा मृत्यू
Dec 1, 2020, 19:31 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात लागोपाठ चौथ्या दिवशी ( मंगळवार ) कोरोनामुळे दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या कमी असली तरी मृत्यू दर जास्त आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवार दि. १ डिसेंबर रोजी नव्या २६ रुग्णाची नोंद झाली तर ५२ जण बरे होवून घरी परतले. ही नोंद फक्त शासकीय असून, खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाची नोंद नाही तसेच होम कॉरंटाईन झालेल्या रुग्णाची नोंद नाही.
गेल्या २४ तासात कण्हेरी येथील ५० वर्षीय स्त्री आणि टाकळी ढोकी येथील ६१ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनाने ५७३ रुग्णाचा बळी घेतला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार ७७६ रुग्ण आढळून आले असून, पैकी १४ हजार ९६७ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या २५८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.