कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात लागोपाठ दुसऱ्या दिवशी दोन रुग्णाचा मृत्यू 

 
कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात लागोपाठ दुसऱ्या दिवशी दोन रुग्णाचा मृत्यू

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात लागोपाठ दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे दोन  रुग्णाचा मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यात गेल्या २४ तासात २१ नव्या रुग्णाची वाढ झाली आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात रविवार  दि. २९  नोव्हेंबर रोजी  ३६  जण बरे होवून घरी परतले. ही  नोंद फक्त शासकीय असून, खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाची नोंद नाही तसेच होम कॉरंटाईन झालेल्या रुग्णाची नोंद नाही. 

 
गेल्या २४ तासात  तेरखेडा बावी ता. वाशी येथील  ६५ वर्षीय पुरुष आणि देऊळगाव ता. परंडा येथील ६० वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनाने ५६९ रुग्णाचा बळी घेतला आहे. 
 
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार ७२७ रुग्ण आढळून आले असून, पैकी १४ हजार ८५४   रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या ३०४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 

From around the web