कोरोनाने नवा अवतार घेतल्याने इंग्लडमधून आलेल्या प्रवाश्याचा शोध सुरु
उस्मानाबाद - कोरोना विषाणूमध्ये झालेल्या जनुकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लडहून आलेल्या प्रवाश्यांचे विशेष सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. आरोग्य अधिकारी इंग्लडमधून आलेल्या प्रवाश्याचा शोध घेत आहेत.
विमानतळ आरोग्य अधिकाऱ्याकडून २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लडहून आलेल्या प्रवाश्यांची यादी प्रत्येक जिल्ह्याला आणि महापालिकेला पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य अधिकारी इंग्लडमधून आलेल्या प्रवाश्याचा शोध घेत आहेत.
इंग्लडमधून आलेल्या प्रवाश्यानी स्वतःहून आरोग्य विभागाला माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या गावात किंवा शेजारी कुणी इंग्लडमधून आला असेल तर त्याची माहिती प्रशासनास द्यावी, असे कळवण्यात आले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार २१८ रुग्ण आढळून आले असून, १५ हजार ५१२ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत कोरोनाने ५६३ जणांचा बळी घेतला असून, जिल्ह्यात सध्या १४३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.