कोरोना : जेष्ठ वकील अरुण महामुनी यांचे निधन

मागील बारा दिवसात आठ वकिलांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू
 
कोरोना : जेष्ठ वकील अरुण महामुनी यांचे निधन

उस्मानाबाद - कोरोनाने अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत. अनेक  घरातील कुटुंब प्रमुख गमावले आहेत, त्यातून वकीलही  सुटू शकले नाहीत. उस्मानाबादेत आणखी एका जेष्ठ वकिलांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 


जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दररोज किमान १०  ते २० जणांचा मृत्यू होत आहे. मागील बारा  दिवसांत  आठ वकिलांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

उस्मानाबाद वकील संघांचे जेष्ठ वकील अरुण कालिदास महामुनी (  वय ६५, रा. उस्मानाबाद ) यांचे सोलापूर येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.  वकील संघाने आणखी एक निष्णात वकील गमावला आहे.


यापूर्वी फौजदारी क्षेत्रातील ज्येष्ठ व नामांकित वकील अशी राज्यभर ओळख असलेले अँड दत्तात्रय उर्फ आबा बारखडे ( वय ६२ ) अँड भारती रोकडे ( वय ४६ )  अँड विनोद गंगावणे ( वय ४५  ) अँड बापूसाहेब गंजे (वय ५३  ) अँड नारायण वडणे ( वय ४५  ) व उमरगा येथील ॲड.रवींद्र बिराजदार ( वय ४४  ) अ‍ॅड. राम अनंतराव कुलकर्णी ( वय ४४ )  या सात  वकिलांचा  कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

वकीलासाठी कसलेही सुरक्षा कवच नाही,त्यांच्या मागे वारसांना कसलीही आर्थिक सुरक्षा नाही, वकिलाचा अनेक बाबतीत थेट संपर्क पक्षकाराशी येतो त्यामुळे वकिलांना कोरोना संसर्ग जास्त आहे. वकील लोकांना तातडीने लसीकरण करण्याची गरज आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा वकिलांचा मृत्यू या लाटेत झाला आहे.अनेक वकिलांचे नातेवाईक यात बळी पडले आहेत.वकिलांच्या वारसांना शासनाने मदत करण्याची आवश्यकता आहे. शासनाने वकिलांच्या वारसांना तात्काळ 25 लाख रुपयांची मदत करावी,  अशी मागणी जिल्हा विधिज्ञ मंडळचे अध्यक्ष अँड नितीन भोसले यांनी केली आहे.

From around the web