कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांसाठी आर्थिक लाभाची योजना नसल्याचा खुलासा

समाज माध्यमातील संदेश बनावट : निपाणीकर
 
कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांसाठी आर्थिक लाभाची योजना नसल्याचा खुलासा

उस्मानाबाद - जिल्ह्यात दि.01 मार्च-2020 ते 28 फेब्रुवारी-2021 या कालावधीत ज्या घरातील 21 ते 70 या वयोगटातील कर्त्या व्यक्तींचे कोरोनामुळे निधन झालेल्या विधवा महिलांना महिला व बाल विकास विभागामार्फत जिजाऊ / जिजामाता या योजनंअंतर्गत पन्नास हजार रुपयाचा लाभ मिळेल.अशी पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले आहे.ही पोस्ट ही खोटी आणि बनावट आहे. अशा प्रकारची कोणतीही योजना महिला व बाल विकास विभागामार्फत कर्यान्वीत नाही,असा खुलासा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी.एच.निपाणीकर यांनी केला आहे.

तथापि,या मेसेजमुळे नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा खुलासा करण्यात आला आहे.अशी कोणतीही योजना महिला व बाल विकास विभागामार्फत राबविली जात नसून या आदेशास नागरिकांनी बळू पडू नये,असेही श्री.निपाणीकर यांनी कळविले आहे.                    

From around the web