कोरोनाचा उद्रेक  : उस्मानाबाद जिल्ह्यात ७ ऑगस्ट रोजी ७२ कोरोना पॉजिटीव्ह , दोन मृत्यू 

जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ९५९
 
Osmanabad police

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. जिल्ह्यात आज ७ ऑगस्ट ( शनिवार ) रोजी ७२ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ८१ रुग्ण बरे होऊन घरी परतले तसेच दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे.  
 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६४ हजार ६२२ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ६१ हजार ७०७  रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १४३१ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ९५९ झाली आहे.

मागील काळात झालेल्या ५२५  मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यात जिल्हा बाहेरील रुग्णालयात व जिल्ह्याबाहेर स्थायिक झालेल्या ३१८ ,कोविड बरा  झाल्यानंतर मृत्यू झालेल्या १०१ आणि इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या १०६ जणांचा समावेश आहे.

d

d

d

d

d

From around the web