कोरोनाचा उद्रेक : उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी ६६ रुग्णाची भर 

जिल्ह्यात  ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या २९२ 
 
corona

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या  झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनासोबतच ओमायक्रॉन रुग्णसंख्येतही भर पडली आहे. शनिवार दि. ८ जानेवारी रोजी एकूण ६६ रुग्णाची भर पडली. जिल्ह्यात गेल्या सहा दिवसात  २६२  रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या २९२  झाली आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या २० च्या आत आली होती, पण नवा कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन आल्यापासून जिल्ह्यात रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे. शनिवार दि. ८ जानेवारी रोजी एकूण ६६ रुग्णाची भर पडली. त्यात उस्मानाबाद २०, तुळजापूर १४, उमरगा २, लोहारा ४, कळंब १८, वाशी २, भूम ६ असा समावेश आहे , समाधानाची बाब म्हणजे परंडा तालुक्यात एकही रुग्ण नाही. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६८ हजार ७५रुग्ण आढळले असून , पैकी ६५ हजार ७०२ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत २०८४ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

d

d

d

d

From around the web