कोरोनाचा उद्रेक : उस्मानाबाद जिल्ह्यात १३ ऑगस्ट रोजी ६३ कोरोना पॉजिटीव्ह , एक मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ८६२
Aug 13, 2021, 19:13 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. जिल्ह्यात आज १३ ऑगस्ट ( शुक्रवार ) रोजी ६३ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर १२२ रुग्ण बरे होऊन घरी परतले तसेच एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६५ हजार १०३ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ६२ हजार २७४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १४३९ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ८६२ झाली आहे.
मागील काळात झालेल्या ५२८ मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यात जिल्हा बाहेरील रुग्णालयात व जिल्ह्याबाहेर स्थायिक झालेल्या ३२१ ,कोविड बरा झाल्यानंतर मृत्यू झालेल्या १०१ आणि इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या १०६ जणांचा समावेश आहे.