कोरोनाचा उद्रेक : उस्मानाबाद जिल्ह्यात १८ जानेवारी रोजी १८२ रुग्णाची भर
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ९३९
Jan 18, 2022, 19:09 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनासोबतच ओमायक्रॉन रुग्णसंख्येतही भर पडली आहे. मंगळवार दि.१८जानेवारी रोजी एकूण १८२ रुग्णाची भर पडली. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ९३९ झाली आहे.
मंगळवारी पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णामध्ये उस्मानाबाद ७४, तुळजापूर ३४, उमरगा ४४, लोहारा १७, कळंब १० , वाशी ० भूम ० , परंडा ३असा समावेश आहे ,तसेच दिवसभरात ३३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६९ हजार ३२७ रुग्ण आढळले असून , पैकी ६६ हजार २९३ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत २०८४ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.