कोरोनाचा उद्रेक : उस्मानाबाद जिल्ह्यात १४ जानेवारी रोजी १७३ रुग्णाची भर
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७६५
Fri, 14 Jan 2022

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनासोबतच ओमायक्रॉन रुग्णसंख्येतही भर पडली आहे. शुक्रवार दि.१४ जानेवारी रोजी एकूण १७३ रुग्णाची भर पडली. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७६५ झाली आहे.
शुक्रवारी पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णामध्ये उस्मानाबाद ८१, तुळजापूर १४, उमरगा ३०, लोहारा १०, कळंब १६, वाशी१८ भूम २, परंडा २ असा समावेश आहे ,तसेच दिवसभरात ४५ रुग्ण बरे होऊन घरी परतले.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६८ हजार ६७१ रुग्ण आढळले असून , पैकी ६५ हजार ८१५ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत २०८४ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.