कोरोनाचा उद्रेक : उस्मानाबाद जिल्ह्यात १३ जानेवारी रोजी १४० रुग्णाची भर
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६३७
Jan 13, 2022, 22:58 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनासोबतच ओमायक्रॉन रुग्णसंख्येतही भर पडली आहे. गुरुवार दि.१३ जानेवारी रोजी एकूण १४० रुग्णाची भर पडली. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६३७ झाली आहे.
गुरुवारी पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णामध्ये उस्मानाबाद ४०, तुळजापूर २४, उमरगा ३२, लोहारा ४, कळंब २८, वाशी ११, भूम ०, परंडा १ असा समावेश आहे ,तसेच दिवसभरात १९ रुग्ण बरे होऊन घरी परतले.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६८ हजार ४९८ रुग्ण आढळले असून , पैकी ६५ हजार ७७० रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत २०८४ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.