कोरोना उपचारासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात तीन रुग्णालय

 
कोरोना उपचारासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात तीन रुग्णालय

उस्मानाबाद : कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील 30 शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. 2305 खाटा कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

या अधिसूचनेमुळे या रुग्णालयांना संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असणार आहे. राज्य सरकारमार्फत कोरोना प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. राज्यात चाचण्यांची सुविधा वाढविताना आवश्‍यकता भासल्यास रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष केले आहेत; मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये घोषित केली आहेत. त्यासाठी आरोग्य संचालकांनी अधिसूचना काढली आहे, असेही टोपे यांनी सांगितले.

 कोरोना उपचारासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन रुग्णालयाचा समावेश आहे. 


  • उस्मानाबाद- जिल्हा रुग्णालय, नवीन इमारत 100 
  • उमरगा उपजिल्हा रुग्णालय टीसीयू बिल्डिंग 50 
  • तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय नवीन इमारत 50 

From around the web