धक्क्यादायक : उमरगाचा आणखी एक व्यक्ती कोरोनाग्रस्त

 
उस्मानाबाद जिल्ह्यात रुग्णांची संख्या तीन 
धक्क्यादायक : उमरगाचा आणखी एक व्यक्ती कोरोनाग्रस्त


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या जाळ्यात आणखी एक व्यक्ती आला आहे, उमरगा येथील एका ५५ वर्षीय नागरिकाचा स्वाब नमुना पॉजिटीव्ह आला आहे, त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या तीन झाली आहे. 

सदर कोरोना बाधित व्यक्तीला उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले आहे.  बलसूर आणि उमरगा असे दोन रुग्ण येथे ऍडमिट आहेत तर धानूरीच्या रुग्णाला तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. 

एकीकडे शनिवार आणि रविवार हे दोन दिवस जनता कर्फ्यू सुरु आहे, तर दुसरीकडे उस्मानाबाद जिल्ह्यात रुग्णाची संख्या वाढत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. 

From around the web