कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात केवळ १८६ ऍक्टिव्ह रुग्ण 

नव्या रुग्णापेक्षा बरे झालेल्या रुग्णाची संख्या दुप्पट 

 
कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात केवळ १८६ ऍक्टिव्ह रुग्ण

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात  कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, जिल्हयात सध्या फक्त १८६  ऍक्टिव्ह रुग्ण उरले आहेत. तथापी  नागरिकांनी रुग्ण कमी झाले म्हणून हलगर्जीपणा करू नये,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवार  दि. ७ डिसेंबर  रोजी नव्या १६ रुग्णाची नोंद झाली तर ३५  जण बरे होवून घरी परतले. ही  नोंद फक्त शासकीय असून, खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाची नोंद नाही तसेच होम कॉरंटाईन झालेल्या रुग्णाची नोंद नाही.

 
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार ९२९  रुग्ण आढळून आले असून, पैकी १५ हजार १८९ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या १८६  ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोनाने ५५४ जणांचा बळी घेतला आहे.


 

From around the web