कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्ण केवळ १७५ 

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची जोरदार तयारी सुरु 
 
कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्ण केवळ १७५

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात  कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने कमी होत आहे, जिल्हयात सध्या फक्त १७५  ऍक्टिव्ह रुग्ण उरले आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची जोरदार तयारी सुरु आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवार दि. ९  डिसेंबर  रोजी नव्या २५  रुग्णाची नोंद झाली तर ३१  जण बरे होवून घरी परतले. ही  नोंद फक्त शासकीय असून, खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाची नोंद नाही तसेच होम कॉरंटाईन झालेल्या रुग्णाची नोंद नाही.  जिल्ह्यात गेल्या २४ तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला . हिंगणगाव ता. कळंब येथील एक ६५ वर्षाचा वृद्ध कोरोनामुळे दगावला. 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार ९६८   रुग्ण आढळून आले असून, पैकी १५ हजार २३७ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या १७५  ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोनाने ५५६ जणांचा बळी घेतला आहे.


लसीकरणाची जोरदार तयारी

उस्मानाबाद जिल्ह्यात एकीकडे कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने कमी होत असताना, दुसरीकडे कोरोना लसीकरणाची जोरदार तयारी सुरु आहे.जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात लस उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

लस साठवणूक, त्यावरील नियंत्रण व वितरणाच्या वेगवेगळ्या टप्याचा डेमो व कार्यपध्दतीबद्दल आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. लस आल्यानंतर अवघ्या आठ ते दहा दिवसात ती लस प्रत्यक्षात लोकांना दिली जाणार आहे,अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी दिली. 

उस्मानाबाद येथे एकच वेळी २० हजार ते १ लाख डोस साठवणूक करण्याची क्षमता आहे. लस ठेवण्यासाठी ७७ आईस  लाईन  फ्रिझर, लस थंड ठेवण्यासाठी ७८ दीप फ्रिझर, कोल्ड बॉक्स, वॅक्सीन करियर सह  यंत्रणा सज्ज असल्याचेही डॉ. मिटकरी यांनी सांगितले. 
 

From around the web