कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्ण केवळ १४१

 
कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्ण केवळ १४१

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात  कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने कमी होत आहे, जिल्हयात सध्या फक्त १४१  ऍक्टिव्ह रुग्ण उरले आहेत. येत्या काही दिवसात ही  संख्या ५० च्या आत राहील, अशी शक्यता गृहीत धरली जात आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात रविवार  दि.१३  डिसेंबर  रोजी नव्या १९ रुग्णाची नोंद झाली तर २४   जण बरे होवून घरी परतले. ही  नोंद फक्त शासकीय असून, खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाची नोंद नाही तसेच होम कॉरंटाईन झालेल्या रुग्णाची नोंद नाही.  जिल्ह्यात गेल्या २४ तासात एकही रुग्ण दगावला नाही. 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १६हजार ३७ रुग्ण आढळून आले असून, पैकी १५ हजार ३३९ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या १४१  ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोनाने ५५७ जणांचा बळी घेतला आहे.


 

From around the web