कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात २० जानेवारी रोजी ३१० रुग्णाची भर
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १३११
Thu, 20 Jan 2022

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनासोबतच ओमायक्रॉन रुग्णसंख्येतही भर पडली आहे.गुरुवार दि.२० जानेवारी रोजी एकूण३१० रुग्णाची भर पडली. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १३११ झाली आहे.
आज पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णामध्ये उस्मानाबाद १०१ , तुळजापूर ३७, उमरगा ८२, लोहारा २१, कळंब १२ , वाशी ३१ भूम १३ , परंडा १३ असा समावेश आहे ,तसेच दिवसभरात १६० रुग्ण बरे होऊन घरी परतले.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६९ हजार ९७१ रुग्ण आढळले असून , पैकी ६६ हजार ६६५ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत २०८५ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.