कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात २६ मार्च रोजी १५५ रुग्णाची भर, दोघांचा मृत्यू 

जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या १३५५
 
कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात २६ मार्च रोजी १५५ रुग्णाची भर, दोघांचा मृत्यू

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवार दि.२६ मार्च रोजी नव्या १५५ कोरोना रुग्णाची भर पडली तर ९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले.  त्यामुळे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १३५५ झाली आहे तसेच दिवसभरात दोन रुग्णाचा कोरोनामुळे  मृत्यू झाला. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १९ हजार ३९३ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १७ हजार ४४६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ५९२ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर रिपोर्ट पाहा  

From around the web