कोरोनाचा कहर  : उस्मानाबाद जिल्ह्यात ३१ जानेवारी रोजी १४० रुग्णाची भर 

जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १०६६
 
corona

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या  झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनासोबतच ओमायक्रॉन रुग्णसंख्येतही भर पडली आहे,सोमवार  दि.३१ जानेवारी रोजी एकूण १४० रुग्णाची भर पडली. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १०६६ झाली आहे. 
 ,
आज  पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णामध्ये  उस्मानाबाद ३४, तुळजापूर २९, उमरगा २६, लोहारा ९, कळंब १० , वाशी १३ , भूम ८, परंडा ११ असा समावेश आहे ,तसेच दिवसभरात २८० रुग्ण बरे होऊन घरी परतले. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ७२ हजार ६७३  रुग्ण आढळले असून , पैकी ६९ हजार ५१२ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत २०९३ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

d

d

1

d

d

d

From around the web