कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात ५ मे रोजी ७८३ पॉजिटीव्ह, ७ मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७१८३
Wed, 5 May 2021

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.आज ५ मे (बुधवार) रोजी तब्बल ७८३ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ४८७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात ७ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४१ हजार ८८४ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ३३ हजार ७२० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ९८१ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७१८३ झाली आहे.