कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात १ मे रोजी ६६७ पॉजिटीव्ह, १९ मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७११८
May 1, 2021, 20:31 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.आज १ मे ( शनिवार) रोजी तब्बल ६६७ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ६१५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात १९ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ३९ हजार १५ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ३० हजार ९५६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ९४१ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७११८ झाली आहे.