कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात ७ मे रोजी ६६० पॉजिटीव्ह, ८ मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७१३४
May 7, 2021, 20:51 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.आज ७ मे (शुक्रवार) रोजी तब्बल ६६० जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ७६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात ८ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४३ हजार ३५७ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ३५ हजार २१० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १०१३ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७१३४ झाली आहे.